सर्व प्रकारच्या ब्राउझरमध्ये (जलद आणि सुलभ) JavaScript कसे सक्षम करावे? | Enablejavascript.io

जावास्क्रिप्ट ही “क्लायंट-साईड” स्क्रिप्टींग लँग्वेज असून ती प्राथमिकपणे वेबपेजसाठी सर्व प्रकारच्या डायनामिक संवादाला निर्माण करणे आणि जोडण्यासाठी वापरली जाते. तंत्रज्ञानाच्या जगात जलदगतीने विकसित झाल्याने जावास्क्रिप्ट ‘आधुनिक वेब डेव्हलपमेंट’ क्षेत्रात मैलाचा दगड ठरली आहे.

जावास्क्रिप्ट परंपरागत सॉफ्टवेअर डिझाईन लँग्वेजबरोबर उत्तमपणे कार्य करते आणि त्यामुळेच हे वेगळे वैशिष्ट इतर लँग्वेजपासून जावास्क्रिप्ट ला भिन्न आणि उत्तम बनवतं. जेथे सीएसएस आणि एचटीएमएल लँग्वेज वेबपेज ला स्टाईल प्रदान करतात, तेथे जावास्क्रिप्ट वेबपेजेसला इंटरअॅक्टीव्ह एलेमेंट (परस्परसंवादी घटक) प्रदान करतात जे वापरकर्त्याच्या अनुभवाला समृद्ध करतात.

याचाच अर्थ, आपल्या ब्राउजिंग सेशन मध्ये आपल्या डिव्हाईस वर कोणतेही बदल होतात किंवा कोणतीही गोष्ट पॉप अप होते, होय! ती जावास्क्रिप्ट असते.

आजच्या काळात, जावास्क्रिप्ट इतकी परिणामकारक आणि सर्वोत्तम आहे की आधुनिक काळातील ब्राउजर जसे गुगल क्रोम, सफारी, मोझीला फायरफॉक्स, ऑपेरा, इंटरनेट एक्स्प्लोरर, मायक्रोसॉफ्ट एज सुद्धा जावास्क्रिप्ट वापरतात. अँड्रॉइड आणि आय-फोन सारख्या लोकप्रिय मोबाईल डिव्हाईससुद्धा जावास्क्रिप्ट आधारित ब्राउजर्स आणि नेटिव्ह अॅप्लीकेशन्स चालविण्यासाठी सक्षम आहेत.

जेव्हा आपल्याला जावास्क्रिप्टचे महत्त्व कळते त्यावेळी आपल्याला जावास्क्रिप्टला समजणे खूप सोपे होते, तर चला, याविषयी अधिक माहिती घेऊ.